मूल्य रहित अर्थव्यवस्थेचे दुष्परिणाम


मूल्य रहित अर्थव्यवस्था 

आजची अर्थव्यवस्था ही मूल्याधारित नाही. मूल्य याचा अर्थ आपण शुध्द व्यावहारिक अर्थाने घेतो. पण व्यावहारिक अर्थाबरोबरच मूल्य हे वैचारिक असू शकते, नैतिक असू शकते तसेच धार्मिक ही असू शकते. 

आज आपण व्यापार आणि व्यवहार करताना समोरच्या व्यक्तीशी आपला वैचारिक मतभेद आहे किंवा नाही याचा विचार करीत नाही किंवा असे करणे अपेक्षित ही नसते. एखाद्या लहान गावात एखाद्या दुकानात किंवा हॉटेलात जी माणसे नेहमी खरेदी करतात त्यातली बहुतांश माणसे ही त्या दुकानदाराच्या ओळखीची असतात. पण जसजसे आपण मोठ्या शहरात पाहायला जाऊ तिथे रोज नवी माणसे दुकानात खरेदीसाठी येतात. त्यामुळे दुकानदार आणि त्याचे गिऱ्हाईक यांच्यातला संपर्क हा एखाद्या वस्तूच्या देवाणघेवाणी पुरताच असतो. आणि त्याने दुकानदाराला आणि त्याच्या गिर्हाईकाला काही अडचण होत नाही. 

तर मग व्यवहार आणि व्यवहारात नैतिक मूल्य किंवा त्यामुळे निर्माण होणारा मतभेद याचा दुकानदारावर किंवा गिऱ्हाईकावर कसा पडू शकतो. 

तेच मी तुम्हाला येथे सांगायचा प्रयत्न करत आहे. नैतिक मुल्यांचा विचार न करता जर तुम्ही व्यवहार करीत राहिला तर त्याचा जागतिक अर्थव्यवस्थेवर विपरीत परिमाण घडतो. किंवा घडत आहे असे मला मांडायचे आहे. 

ही गोष्ट मी अत्यंत सोप्या रीतीने मांडीन. चीन 1 October 1949  कम्युनिस्ट देश म्हणून घोषित झाता. 11 December 2001 पर्यंत चीन हा WTO म्हणजे जागतिक व्यापार संघटनेचा सदस्य नव्हता. त्यामुळे चीनचा जगातील इतर प्रगात देशांशी व्यापारिक देवाणघेवाण करण्याला मर्यादा होत्या. पण अमेरिकेतील अर्थतज्ञांनी, राजकारण्यांनी आणि गुंतवणूकदारांनी असा निर्णय घेतला कि भले चीन कम्युनिस्ट असो, तेथे लोकांकडे लोकशाहीचे स्वातंत्र्य नसो, तेथील कम्युनिस्ट राजवट ही पाश्चात्य अर्थव्यवस्थेला आणि लोकशाहीला आपला शत्रू मानत असो तरीही चीनी कामगारांनी बनवलेले साहित्य आपल्याला कमी दरात मिळते आणि त्याने पाश्चिमात्य व्यापारी, आणि गुंतवणूकदार यांचा फायदा होतो असे लक्षात येताच अमेरिकी कंपन्या आणि गुंतवणुकीचा चीनकडे ओघ लागला. आणि बघता बघता चीन हा जगातल्या समृध्द देशांशी स्पर्धा करण्या इतका सामर्थ्यशाली बनला.सुरवातीला नाईलाजाने अमेरिकन कंपन्यांना चीनमध्ये कारखाने उघडू दिल्यानंतर जेव्हा चीनच्या लक्षात आले की कंपन्या ही ते स्वतःच्या बनवू शकतात तेव्हा त्यांनी अमॅझोन, गूगल आणि फेसबुक सारख्या कंपन्यांना टक्कर देण्यासाठी चीनमधील उद्योजकांना प्रवृत्त केले आणि Baidu, Alibaba, Tencent सारख्या कंपन्या उभ्या केल्या. त्यानंतर त्यांनी अमेरिकेत जाऊन तेथील उच्च तंत्रज्ञावर आधारित असलेल्या कंपन्यामध्ये गुंतवणूक केली. तसेच Huawei सारख्या कंपन्यांनी जगात सर्व देशात आपले बस्तान बसवले. आधुनिक  5G तंत्रज्ञानात असलेल्या अमेरिकेतील Patent मध्ये 80 टक्के Patent हे एकट्या चीनी Huawei कंपनी कडे आहेत. 

एवढे सगळे झाल्यानंतर सगळ्यांना जाग येते. चीन मधील कम्युनिस्ट राज्य सत्तेला नव्याने अति श्रीमंत झालेल्या चीनी उद्योजकांची भीती वाटू लागते आणि ते बडगा उगारतात. जगातील सर्वात मोठा IPO उभा करू पाहणाऱ्या Jack Ma या उद्योजकाला IPO उघडण्याआधी नजरकैद केले जाते. त्याच्या कंपनीचे सर्वाधिकार कम्युनिस्ट अधिकाऱ्यांच्या नावे करून घेतली जातात आणि त्याला त्याच्याच कंपनीच्या दैनंदिन कारभारापासून वेगळे करून निवृत्त केले जाते. इकडे अमेरिकन लोकांचे डोळे उघडतात आणि Trunp राष्ट्रपती झाल्यानंतर चीनची अमेरिकेत पसरलेली पाळेमुळे खोदून काढायला सुरवात होते.

तर हे सर्व कशामुळे झाले ? व्यवहारात नैतिकतेचा विचार न केल्यामुळे. पटते का मी काय म्हणतो ते?  आपलेही यावरील विचार कळवा. 

Comments

Popular posts from this blog

How to find if your phone has any virus that affects your computer.

Zuck has lost it

Etymology of word bull