तंत्रज्ञानाचा दुरुपयोग

तंत्रज्ञानाचा दुरुपयोग. जेव्हा मायक्रोसॉफ्ट ने कॉम्प्युटर operating system आणि इतर सॉफ्टवेअर च्या क्षेत्रात आपले बस्तान बसवले त्यानंतर त्यांनी कॉम्प्युटर वर आणि ऑनलाईन गेम खेळण्यासाठी X Box या नावाने गेमिंग कॉम्प्युटर आणला. माझ्या मते हा तंत्रज्ञानाचा दुरुपयोग आहे. चीन मध्ये जेव्हा युरोपीय व्यापारी पोहोचले तेव्हा त्यातले काही जण भारतातून अफू नेऊन चीन मध्ये विकत असतं. चिनी लोकांना त्याची सवय लागली आणि त्यामधून होणाऱ्या फायद्याची युरोपियन लोकांना सवय लागली. आणि निव्वळ आपल्याला अफूच्या व्यापारातून मिळणारा नफा थांबू नये यासाठी युरोपियन देशांनी चीनमधील त्या भागातील राजवट उलथून टाकली हा इतिहास जाणकारांना माहीत असेलच. या ठिकाणी आर्थिक फायद्यासाठी वाटेल ते विकण्याची आणि हा व्यापार अनिर्बंध करता यावा यासाठी राजवट देखील उलथून टाकण्याची मनोवृत्ती आपण इतिहासात पहिली आहे.
देव आणि दानवांच्या समुद्र मंथनातून अमृत मिळते तसेच विष ही मिळते. त्याच प्रमाणे तंत्रज्ञनाद्वारे आपण मानवी जीवनासाठी उपयुक्त आणि अनुपयुक्त वस्तू निर्माण करू शकतो. एखादी गोष्ट करणे तांत्रिक दृष्ट्या शक्य आहे म्हणून ती करावीच, किंवा एखादी वस्तू वापरण्याने अहित करू शकते तरीही ती वस्तू तयार करावी आणि ती विकावी ही असुरी मानसिकता आहे. प्रेयस आणि श्रेयस या गोष्टी मधला फरक भारतीय लोकांनी आवर्जून जोपासला आहे. प्रेयस म्हणजे एखादी गोष्ट करणे आवडू शकते म्हणून ती करावी, श्रेयस म्हणजे एखादी गोष्ट प्रथम दर्शनी अप्रिय जरी वाटली तरी त्यामुळे श्रेष्ठ परिणाम होईल याची खात्री असेल तर ती करावी हा यामागील सिद्धांत आहे.
पाश्चात्य विचार सरणी मध्ये वेग वेगळ्या कर्मातील हे सूक्ष्म भेद समजून त्यानुसार आपले व्यावहारिक निर्णय घेण्याची परंपरा नाही.
असो, तर Microsoft आणि इतर कंपन्या मोठ्या जोमाने कॉम्प्युटर वर गेम खेळण्यासाठी हार्डवेअर आणि गेम्स बनवू लागली, आणि कॉम्प्युटर साठी गेम तयार करणे हा एक स्वतंत्र व्यवसाय बनला.
पण एक गोष्ट याठिकाणी नजरेतून सुटली ती म्हणजे ही की कॉम्प्युटरवर किंवा मोबाईलवार गेम खेळणारे अधिकांश युजर्स हे वयस्क नसतात तर ती लहान मुले असतात. लहान मुलांना लाखो रुपये खर्चून बनवलेले हिंसक आणि उत्तेजक गेम्स खेळण्याची सवय लावणे आणि या गोष्टीला आधुनिकतेचे किंवा विकासाचे द्योतक समजून पालकांनी त्याकडे कानाडोळा करणे हे आता अती झाले.
South korea मध्ये Halloween या सणासाठी घराबाहेर पडलेली कोवळ्या वयातील मुले गल्लीत चेंगरचेंगरीला बळी पडली. याचे कारण तेथील मुलांमध्ये कॉम्प्युटर गेमिंगचे लागलेले व्यसन आणि त्यामधून मुलाची व्यवहारात कसे वागावे, सडकेवर चालताना कोणती काळजी घ्यावी, याचे भान नसणे हे या दुर्घटनेला कारणीभूत ठरले.


Comments

Popular posts from this blog

How to find if your phone has any virus that affects your computer.

ओशो का रशिया के नाम संदेश

Zuck has lost it